आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहे. त्यातच आता महायुती असेल किंवा महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपा वरून आत्ताच रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपला हरविण्यासाठी विरोधकांनी नवीन इंडिया आघाडी तयार केली. या आघाडीतला प्रमुख पक्ष काँग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठे धक्के बसतानी आपल्याला दिसत आहे. काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. हा काँग्रेसला एक मोठा धक्का मानला जात आहे.देवरा यांचे कुटुंब काँग्रेसमध्ये मागील 55 वर्षांन पासून काँग्रेसमध्ये होते.
आता काँग्रेस मध्ये दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे भाजपच्या वाटेवर ?आहे आता अशा चर्चा सुरू झाल्या आहे. अक्कलकोट मध्ये एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले माझा दोन वेळा पराभव झाला. तरी भाजपची मला आणि प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये येण्याचा प्रस्ताव दिला आहे. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आले आहे.
आज भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे त्यांच्या घरी जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर्ती आहे. त्याच दिवशी सुशील कुमार शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.












