पिंपरी चिंचवड : आज पिंपरी चिंचवड येतील नेहरूनगर कोर्टा दैनिक राज्य लोकतंत्रच्या वतीने पिंपरी चिंचवड बार असोसिएशन वकिलांना विधीज्ञ रोजनिशी वाटप करण्यात आली. मागील दोन वर्षां पासून राज्य लोकतंत्रकडून हा प्रकल्प राबण्यात येत आहे. या निमित्ताने वकिलांसोबत स्नेह भेट होते. नवीन वर्षात त्यांना या डायरी दिल्या जातात जेणे करून वर्षभर त्यांना याचा वापर होईल.
राज्य लोकतंत्र च्या वतीने पिंपरी चिंचवड न्यायालय येथील पिंपरी चिंचवड बार असोसिएशनच्या वकिलांना विधीज्ञ रोजनिशी भेट स्वरूपात देण्यात आली या वेळेला पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचया अध्यक्ष एडवोकेट प्रमिला गाडे, उपाध्यक्ष एडवोकेट गोरख कुंभार, महिला सचिवएडवोकेट वर्षा तिडके ज्येष्ठ एडवोकेट नाना कुंभार व पिंपरी चिंचवड एडवोकेट असोसिएशनचे सर्व एडवोकेट उपस्थित होते प्राथमिक स्वरूपात रोजनिशी लोकतंत्रच्या सचिव, अनुष्का कोंडा यांच्या हस्ते देण्यात आले या संदर्भात वकील बार असोसिएशनच्या अध्यक्ष प्रमिला गाडे, यांनी दैनिक लोकतंत्रचे आभार मानले व भविष्यसाठी शुभेच्छा दिल्या.











