मुंबई : आम्ही युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य,मुंबई विद्यापीठ,मुंबई उपरोक्त विषयास अनुसरून अशी मागणी करीत आहोत की,मुंबई विद्यापीठाच्या दुरस्थ शिक्षण विभाग (IDOL) च्या प्रथम वर्ष /सत्र व्यवस्थापन अभ्यासक्रम (MMS) करीता आज होऊ घातलेल्या परीक्षेला financial management सत्र २ ऐवजी financial account सत्र १ या विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली तेव्हा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी सदर बाब लक्षात आणुन दिली असता financial management या विषयाची प्रश्नपत्रिका उपलब्ध नसल्यामुळे परीक्षा रद्द करुन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वास्तविक दूरस्थ शिक्षण विभाग येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी आपला नोकरीधंदा करुन शिक्षण घेत असतात त्यांना सुट्टया मिळणे कठीण असते या सर्व बाबींची तडजोड करुन परीक्षा देत असतात त्यांना पुन्हा सुट्टी मिळणे कठीण असते तरी आजच्या प्रश्नपत्रिका बदलास जबाबदार अधिकाऱ्यावर तसेच दुसरी प्रश्नपत्रिका तयार न ठेवण्यास जबाबदार शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत आहोत.
मुंबई विद्यापीठ दूरस्थ शिक्षण विभाग (IDOL) पदव्यूत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रम (MMS) परीक्षेला चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली अशी तक्रार विद्यार्थ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर मान.कुलगुरु यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलला नाही तर मान.प्र कुलगुरु नेहमीप्रमाणे कामकाजाच्या दिवशी not reachable होते परिणामी सदर निवेदन युवासेना माजी व्यवस्थापन परीषद सदस्य श्री.प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी मान.कुलगुरु प्रा.(डॉ.) रविंद्र कुळकर्णी यांना ई मेल द्वारे पाठविण्यात आले असुन प्रत्येक विषयाच्या तीन प्रश्नपत्रिका तयार असतात परंतु आजच्या परिक्षेला एकही आवश्यक प्रश्नपत्रिका तयार नाही या भोंगळ कारभारास जबाबदार शिक्षक/ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी सिनेट सदस्य यांनी केली आहे.












