कोयत्याने हल्ला करण्याच्या घटना पुन्हा वाढू लागले आहेत स्वारगेट बस स्थानकाच्या मेन गेट जवळ एका व्यक्तीच्या हातावर वार केल्याची घटना गुरुवार घडली.
फिर्यादी समीर कांबळे वय 28 राहणार धनकवडी हे रिक्षात बसले होते अज्ञात इसमांनी जुन्या वादाच्या रागातून त्यांना रिक्षातून बाहेर ओढले. “तुला खूप माज आहे, आज तुझ्याकडे बघतोच, आज तुला सोडणार नाही” असे म्हणतील इसमांनी फिर्यादी यांच्या हातावर कोयत्याने वार केला. तसेच इसमांनी फिर्यादीस लाथा बुक्क्यांनी ही मारहाण केली या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये भादविक 323, 326, 427, 504, 506, महा पो कायदा कलम 37 (१) सह 135 अंतर्गत अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला.
रिक्षातून बाहेर ओढत कोयत्याने वार












