आजकाल आपण बघतो शहरात अपघाताची संख्या ही भलतीच वाढलेली दिसते.अनेकदा वाहन चालवत असताना चालक हे दुसऱ्याच विचारात मग्न असतात.त्यामुळे अनेकदा अनेकांना आपल्या जीवास मुकावे लागते.अशीच एक घटना लोणीकंद पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडली आहे.
लक्ष्मण चिन्नास्वामी रामलिंगम ( वय 38, रा. गायकवाड वस्ती, कोलवडी ) असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी आशिष रामप्रसाद ( वय 23, रा. गुलमोहर सिटी, बकोरी फाटा, वाघोली ) यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी हे त्यांची सहकारी महिला ( वय 19, रा. लेन नं 8, बकोरी फाटा, वाघोली ) हिच्यासह त्यांच्या मोटरसायकल वरून केसनंद येथे जात असताना त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या बोअरवेल ट्रक वरील चालक यांने त्याच्या ताब्यातील ट्रक निष्काळजीपणे,अविचाराने,भरधाव वेगात चालवून फिर्यादी चालवत असलेल्या मोटर सायकल ला धडक दिली.त्यामुळे फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या महिला सहकारी हिला गंभीर दुखापत झाली असून त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.
आरोपीवर भादवी कलम ३०४ ( अ ),२७९,३३७,३३८ मो.वा.का.क १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे हे करत आहेत.












