पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०८ : अजित दादा पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर बारामतीतून आज रणजीत अशोकराव तावरे यांची संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बारामती तालुक्यातील अजितदादा नंतर संचालक पदी कोणाची वर्णी लागणार याची बरीच चर्चा रंगली होती. अजित दादा पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार आज बँकेचे अध्यक्ष श्री. दिगंबर दुर्गाडे यांनी अ वर्गातून रणजीत अशोकराव तावरे यांचे नाव संचालक पदासाठी सुचवले.
त्यानुसार आमदार दत्तात्रय भरणे यांनी सूचक तर माजी आमदार रमेश थोरात यांनी अनुमोदन देऊन त्यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली.












