व्हाट्सअप वर मेसेज करून नोकरीचे आमिष दाखवत एका इसमाकडून १३ लाख रुपये लुटले. ही घटना सोहन शत्रुघन प्रसाद वय २१ रा. दिघी पुणे याने दि. ०७ रोजी दिघी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिल्यानंतर उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहन हा दिघी येथे वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करत असून त्याला दि. २४ जून रोजी त्याच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप द्वारे, मी आई स्प्रोस्पेक्ट एजन्सी मध्ये कामाला असून, आमचे फ्रीलान्सिंग मध्ये जॉब आहे, तुम्ही जॉईन झाल्यास तुम्हाला फायदा होईल’ असा मेसेज त्याला पाठवत https://www.youtube.com@airtel हि लिंक पाठवून , व टेलिग्रामवरती टेलिग्राम आयडी https://t.me/Luck199911 असे मेसेज पाठवत फिर्यादीला जॉईन करून घेऊन त्याला वेगवेगळ्या रक्कमेचे टास्क देण्यात आले. फिर्यादी सोहन यांच्या या जाळ्यात गुंतून तो टास्क करायला लागला त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीने फिर्यादीला वेगवेगळ्या अकाउंट नंबर वरती ऑनलाईन पैसे पाठवण्यास सांगितले असता सोहनने पैसेही पाठवले मात्र त्याला पैसे परत न देत वारंवार फिर्यादीचे टेलिग्राम आयडी @sohan यावर मेसेज करून दि. २४ जुन ते ३० जुन पर्यंत वेगवेगळ्या रकमेद्वारे टप्प्याटप्प्याने फिर्यादीचे एकूण १३ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करुन विश्वासघात केला म्हणुन दिघी पोलीस स्टेशन मध्ये सोहन यांच्या तक्रारीवरून संबंधित मोबाईल नंबर व टेलिग्राम आयडी यांच्यावर भा.द.वि. कलम ४२०,४०६ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास दिघी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघमोडे करत आहेत.












