भारतासाठी विश्वचषकात करिष्मा करणारा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शमीला मंगळवारी (९ जानेवारी) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अर्जुन पुरस्कार मिळवणारा शमी हा 58 वा क्रिकेटपटू आहे. यामध्ये १२ महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तब्बल दोन वर्षांनंतर एका क्रिकेटपटूला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.
अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी म्हणाला की, “अर्जुन पुरस्कार मिळणे हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे.” तो पुढे म्हणाला की, “काही माणसे यासाठी सर्वस्व पणाला लावतात. लोकांचे आयुष्य निघून जाते पण तरीही काही व्यक्तींना हा पुरस्कार मिळत नाही. तसेच, काहींना आयुष्याच्या शेवटी मी मिळतो. मी नशीबवान आहे की मला हा पुरस्कार मिळाला.”
भारतासाठी मोहम्मद शमीची कारकीर्द
मोहम्मद शमीने भारतासाठी पहिला सामना २०१३ मध्ये वेस्ट इंडिज संघा समोर खेळला शमी आतापर्यंत भारताकडून ६४ कसोटी सामन्यांमध्ये २२९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १०१ एकदिवसीय सामन्यात १९५ विकेट्स आणि २३ टी-२० सामन्यात २४ विकेट्स घेतल्या आहेत. शमी आयपीएलमध्ये अनेक संघांकडून खेळला आहे. त्याने ११० सामने खेळले आहेत. या काळात शमीने १२७ विकेट्स घेतल्या आहेत.












