महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पतीच्या दोन मित्रांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १५ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात आणि आरोपीच्या कारमध्ये घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सातारा येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय पीडित महिलेने सोमवारी (दि.८) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन बाळासाहेब आप्पासाहेब पवार (वय-४० रा. कराड, सातारा), सुशांत पवार यांच्यावर आयपीसी ३७६/२/एन, ३८६(ड), ३७७, ३५४सी, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीच्या ओळखीचा आरोपी बाळासाहेब पवार याने फिर्यादी यांना पंढरपूर येथे सोडतो असे सांगून कारमधून पुण्यात आणले.पवार याने फिर्य़ादी अंघोळ करत असतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी पवार याने जबरदस्तीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच बाळासाहेब पवार याने त्याचा मित्र सुशांत पवार याला बोलावून घेतले. त्याने देखील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.












