देशात नवीन बनलेली विरोधी पक्षांची इंडिया आघाडीची आज बैठक ऑनलाइन पद्धतीनं पार पडली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीशकुमार यांनी अध्यक्ष व्हावं, असा प्रस्ताव मांडला गेला होता. मात्र, नितीशकुमार यांनी हा प्रस्ताव नाकारल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. नितीशकुमार यांनी संयोजक होण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आजच्या बैठकीला १४ प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे या बैठकीत सहभागी झाले नव्हते.
लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची आजची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाकपचे नेते सीताराम येचुरी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते स्टॅलिन यांच्यासह प्रमुख नेते सहभागी झाले होते.
भारत आघाडीच्या बैठकीत संयोजक पदावरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीश कुमार यांच्या नावाचा काँग्रेसने संयोजकपदासाठी प्रस्ताव ठेवला होता. मात्र, नितीशकुमार यांनी संयोजक पद स्वीकारण्यास नकार दिला. मला कोणत्याही पदामध्ये स्वारस्य नसल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले.या आघाडी तळागाळात विस्तार करणे आवश्यक आहे. महायुतीत सामील असलेल्या पक्षांमध्ये एकजूट असणे गरजेचे असल्याचे गेखील नितीश कुमार म्हणाले.












