पुणे : लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभुमीवर शहरातील २ पोलिस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे बदल्या नंतर आता उपायुक्तांच्या बदल्या बाबतचे आदेश काढले आहेत.
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांची झोन-४ चे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर झोन-४ चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांची वाहतूक शाखेत उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.












