असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहरतर्फे पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस यांच्या वर्धापन दिनानिमित्त संपर्क कार्यालय चिंचवड येथे विविध क्षेत्रातील असंघटित कामगारांना त्रिफळ व गुच्छ देऊन गौरविण्यात आले.
तसेच कामगारांना ई श्रम कार्ड व मतदान कार्ड वाटप करण्यात आले यावेळी स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप शेठ पांढरकर, अनिरुद्ध कांबळे माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, चिंचवड विधानसभेचे माजी अध्यक्ष संदेश नवले, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शाबुद्दीन भाई शेख, काँग्रेसचे नेते अजय खराडे, घरेलू महिला शहराध्यक्ष वंदनाताई आराख ,पिंपरी विधानसभा अध्यक्ष अंजू ताई खन्ना ,भोसरी विधानसभा अध्यक्ष निकिता ताई बोराटे ,सोशल मीडिया समन्वय स्नेहल मनोहर स्वाती जाधव, रूपालीताई अवसरमल ,कार्यालयीन सचिव प्रीती ओहोळ ,कुसुमताई भोळे, व विविध क्षेत्रातील शेकडो कामगार या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन आयुष्यमान सुंदर कांबळे शहराध्यक्ष असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांनी केले . सूत्रसंचालन आयुष्यमान प्रदीप भाऊ कांबळे अध्यक्ष पिंपरी विधानसभा यांनी केले












