सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाचा सहा विकेटने ऑस्ट्रेलियाने पराभव केला. 2003 प्रमाणे पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया विश्वविजेता बनला आणि विक्रमी सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला.
भारताने 50 षटकात सर्व गडी गमावून 240 धावा केल्या होत्या. सुरुवातीला 3 विकेट झटपट पडल्यावर कांगारू दडपणाखाली आले होते पण ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी मैदानावर राहून सामना एकतर्फी केला. अशा प्रकारे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये 140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला सुरुवातीचे 10 षटकं कठीण होते. या वेळी 3 विकेट पडल्या आणि छोट्या लक्ष्याचा बचाव करण्यात टीम इंडिया यशस्वी होईल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. डेव्हिड वॉर्नर (7), मिचेल मार्श (15) आणि स्टीव्हन स्मिथ (4) यांच्या विकेट्स पडल्या.
जसप्रीत बुमराहच्या नावावर दोन विकेट, तर एक विकेट मोहम्मद शमीच्या खात्यात गेली. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी डाव सावरला. रिकी पाँटिंगप्रमाणेच ट्रॅव्हिस हेडने एकतर्फी शतक झळकावून भारताच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. हा तोच ट्रॅव्हिस हेड आहे, ज्याने यंदाच्या WTC फायनलमध्ये मॅच-विनिंग इनिंग खेळली होती.












