ऑफिसात काम करणाऱ्या तरुणीचे चोरुन फोटो काढून ते मॉर्फ करणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.21) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने भोसरी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

यानंतर आरोपीने तरुणीचा फोटो मॉर्फ केला. तरुणीचा चेहरा नग्न अवस्थेतील महिलेच्या बॉडीला लावून तो फोटो मोबाईल मध्ये सेव्ह केला. गुरुवारी सायंकाळी तरुणीने आरोपीच्या मोबाईल मध्ये तिचा मॉर्फ केलेला फोटो पाहिला असता त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न झाली. तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी साहिल याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.