मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला दिलेली मुदत उद्या संपत आहे. दरम्यान त्यापूर्वी आज बीड शहरात मनोज जरांगे यांची निर्णायक इशारा सभा होत आहे.
या सभेतून मनोज जरांगे २४ डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहे. त्यामुळे या सभेला राज्यभरातील मराठा आंदोलक आणि मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत.
या सभेसाठी तब्बल पाच लाख लोकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या सभेतून मनोज जरांगे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.












