पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १८ : पुणे ग्रामीण पोलीस दलाचे लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा चार्ज घेतल्यापासून अवैध धंदयांविरोधात व बेकादेशीर कृत्य करणाऱ्यां विरोधात धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे, त्याचप्रमाणे नशा मुक्ती अभियान ही त्यांच्याकडून सुरू करण्यात आला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून कामशेत बाजारपेठामध्ये काही ठिकाणी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधक असलेला गुटखा पान मसाला इत्यादीची अवैधपणे विक्री होत असल्याबाबतची बातमी त्यांना मिळाली होती. या बातमीच्या अनुषंगाने दि.१४ रोजी सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागीय व कामशेत पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचून कामशेत बाजारपेठातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील १) भरत चंपालाल जैन यांच्या मे शिवम ट्रेडर्स या दुकानाचे गोडाऊन मधून तसेच २) गीताराम शुक्रा चौधरी या किराणा दुकानांमधून व राहते घरातून त्याचप्रमाणे ३) महावीर सुखराज्य यांच्या बोला ट्रेडर्स या दुकानातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पानमसाला इत्यादी पदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणावर जप्त केला आहे.
या सर्व आरोपींविरुद्ध कामशेत पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम ३२८, २७२, २७३ सह अन्नसुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ५९ व इतर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई मध्ये तिन्ही दुकानदारांकडून एकूण २ लाख ५३ हजार २४८ रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला इतर प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला असून पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई शुभम चव्हाण करत आहे.
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक नितेश गट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पो. शि. शुभम चव्हाण, पो. हवा. सागर बनसोडे, पो. हवा. बंटी कवडे, पो.ना. रईस मुलांनी व पो. शि. आशिष झगडे यांच्या पथकाने केली आहे.












