पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या तीन अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना तक्रारी अर्ज देण्यात आला आहे.
दत्तात्रय कोंडीबा गायकवाड वय ३३ वर्ष, रा. किवळे गाव, किवळे असे अर्जदाराचे नाव असून यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग येथे कार्यरत असलेले उप अभियंता तथा जन माहिती अधिकारी महेश बरीदे, सहाय्यक जन माहिती अधिकारी पंकज धोंडे व उपअभियंता तथा जन माहिती अधिकारी दिनेश फाटक यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मध्ये तक्रारी अर्ज दिला आहे.
सदर अर्जामध्ये भा.द. वि. कलम १८८, १९३२, १९९, २१७, २१८, ४७७, ५११, ४०९, ४६४, २१९ तसेच फौजदारी पात्र गैरवर्तन नुसार कलम १३(१)(अ),(क), (ड), (ई), १३(२) सुधारणासह १५ व बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा १९६७ कलम ३, १०, ११, १६, १६अ, ३८, ३९, व ४० तसेच मुंबई सराईत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा १९५१ कलम ३, १२ व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा २००२/२०१२ चे कलम नुसार गुन्हा नोंद करून कारवाई करणे बाबतचा अर्ज गायकवाड यांनी दिला आहे.












