हिंजवडी पोलीस स्टेशन येथील धंदे विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व आमदार हे हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग असताना पोलीस आमदार रवी पवार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की एक इसम पांढऱ्या टेम्पो ( क्र. एम एच १४ एच यू २५५६) मध्ये गांजा विक्रीसाठी घेऊन येणार आहे, सदर बातमीची खात्री करत हिंजवडीचे व.पो.नी. श्रीराम पॉल यांच्या मार्गदर्शनाखाली सह. पो.नी. खाटाळ व त्यांचे स्टाफ छापा कारवाईच्या उद्देशाने दोन पंचांना सोबत घेऊन, वाकड वस्ती वाकड येथून भुमकर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बातमीदाराने उल्लेख केलेला टेम्पो त्यांना दिसून आला टेम्पोला अडवून विचारपूस केली असता टेम्पोमध्ये भाजीपाल्याचा कचरा आहे असे टेम्पो चालकाने सांगितले मात्र, पाठीमागे जाऊन पाहणी केली असता, त्या कचऱ्यामध्ये चिकटपटीने गुंडाळलेले एकूण १७ पुडे आढळून आले, ते फोडून पाहिला असता एकूण ३१ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांना आढळून आला. टेम्पो चालक सत्तार वय २३, रा. फेज २ हिंजवडी, मूळ राहणार ठाकूरगंज व त्यासोबतच असलेला इसम बिपलभ बिधन रणा, वय २४, रा. फेस २ हिंजवडी; या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून टेम्पो व गांजा सह एकूण १४,३८,०००/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गांजा विक्री करणाऱ्या या इस्मान विरुद्ध हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये एन.डी.पी.सी. ॲक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), अवैध धंदे विरोधी पथकाचे प्रमुख सपोनि अजितकुमार खटाळ, सहा. पोलीस उपनिरीक्षक महेश वायबसे, पोहेकॉ / १०४१ संतोष डामसे, पोलीस अमंलदार / २६५९ रवी पवार यांनी केली आहे.












