पुणे पोलिस गुन्हे शाखा 1 च्या पथकाने अवघ्या बारा तासात घोरपडी पेठ येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.
यावेळी पाच हजार रुपये उसने दिले नाहीत या शुल्लक रागातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नवनाथ लोधा अद्यापही फरार आहे. रोहीत संपत कोमकर (वय ३३ रा.स्वारगेट), गणेश उल्हासराव शिंदे (वय ४१ रा.धनकवडी), अमन दिपक परदेशी (वय २९ रा. घेरपडी) अशी अटक आरोपींची नावे असून या गोळीबारात अनिल रामदेव साहू (वय ३५ रा. घोरपडी पेठ, पुणे) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडीपेठ येथे सोमवार (दि.३०) पहाटे दोघांनी अनिल याच्यावर गोळीबार करत त्याचा खून केला होता. खडक पोलीस ठाण्यात सदर बाबतचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याता तपास करत असताना गुन्हे शाखा १ च्या पथकाला बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, २९ ऑक्टोबरच्या रात्री रोहीत कोमकर याचा वाढदिवस साजरा करत असताना रेकॉर्ड वरील गुन्हेगार नवनाथ लोधा व अनिल साहु यांच्यात कोणत्यातरी कारणावरून भांडण झाले होते.
या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता नवनाथ लोधा हा सराईत गुन्हेगार फुटेजमध्ये दिसत होता. त्यानुसार तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता गुन्ह्यातील आरोपी रोहित कोमकर हा स्वारगेट पी.एम.टी डेपो येथे असल्याची खबर पोलिसांना मिळाली असता, पोलिसांनी रोहीत व त्याच्या दोन साथीदारांना सापळा रचून ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, नवनाथ याने मयत अनिलकडे दोन दिवसांपुर्वी ५ हजार रुपये मागितेले होते. अनिल याने ते देण्यास नकार दिला.
याचा राग मनात धरून अनिल व नवनाथ व इतर आरोपी हे गप्पा मारत बसले असताना नवनाथ याने बांडणास सुरुवात केली. यावेळी अनिल व नवनाथ यांच्यात झटापट झाली.
या झटापटीत रागाने आरोपीन पिस्तूल काढून अनिलच्या कपाळावर गोळी झाडली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. खडक पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.
हि कारवाई गुन्हे शाखा एक चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय़्यद, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अमंलदार राहूल मखरे, हेड कॉन्स्टेबल अजय थोरात, अनिकेत बाबर,आय्याज दड्डीकर,दत्ता सोनवणे व शशिकांत दरेकर यांनी केली.












