पुणे । प्रतिनिधी
पुणे दि. ०४ : साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘पियुची वही’ या डॉ. संगीता बर्वे यांच्या गाजलेल्या पुस्तकाचा दुसरा भाग अर्थात ‘माझं आजोळ’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि पुस्तकातील निवडक प्रकरणांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम बुधवार, दि. 8 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
दिवाळी व बालदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रम सायंकाळी 4 वाजता बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचनकक्ष, आबासाहेब अत्रे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, 352 सोमवार पेठ, लडकत पेट्रोल पंपासमोर, नरपतगीर चौक, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. बर्वे यांच्या उपस्थितीत विविध शाळांमधील मुलांच्या हस्ते होणार आहे. पुस्तकातील निवडक प्रकरणांचे अभिवाचन शालेय विद्यार्थी करणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक, संदर्भ ग्रंथपाल व माहितीतज्ज्ञ प्रसाद भडसावळे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.












