न्यू ईयर एक्झिबिशन ७ जानेवारी पर्यंत
पुणे : काश्मीर मधील कारागिरांनी तयार केलेले कलाकुसरीचे कपडे,साड्या,शाली तसेच सुक्या मेव्याचा समावेश असलेल्या ‘दस्तकारी हाट-काश्मीर एक्स्पो’-न्यू ईयर प्रदर्शनाला काँग्रेस भवन (शिवाजीनगर) येथे प्रारंभ झाला.
७ जानेवारी २०२४ पर्यंत रोज सकाळी ११ ते रात्री ९ यावेळेत हे प्रदर्शन आणि विक्री सुरु राहील. पुणेकरांनी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. साड्या, ड्रेस, सूट, कुर्ती, शाल, दागिने, लोकरीचे कपडे आणि कलाकुसरीच्या वस्तू हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण असून अनिवासी भारतीयांसाठी स्वतंत्र विभाग आहे.खास हिवाळ्यासाठी वूलनचे उबदार कपडे, शाली, स्टोल, पश्मीना प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.
सिल्क साड्या, चंदेरी फॅब्रिक, मुगा सिल्क, कोसा सिल्क,कलमकारी साड्या, बनारसी सिल्क साड्या, कुर्ती, बेड शिट, कार्पेट तसेच अक्रोड, बदाम सारखा सुका मेवाही पुणेकरांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. विणकामाच्या गोष्टीही एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत.












