बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या कामांवर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने ‘महारेरा’ सारख्या यंत्रणेची निर्मिती केली आहे. मात्र याबाबत अनेक नागरिक अनभिज्ञ आहेत.
बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिक महारेराकडे देत असतात. बांधकाम व्यावसायिक महारेराकडे ठरलेल्या वेळेत गृहप्रकल्प पूर्ण करत नाहीत.
ग्राहकांना ज्या सोईसुविधा देण्याचे आश्वासन करारनाम्यात दिलेले असते मात्र ते पाळत नाहीत. याच्याच विरोधामध्ये ग्राहक महारेराकडे तक्रारी करतात. महारेरा त्या तक्रारी तपासून दोषी बांधकाम व्यावसायिकांवर दंड लावून कायदेशीर कारवाई करत असते. परंतु अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा दंड बांधकाम व्यावसायिकांकडून वेळोवेळी भरला जात नाही, त्यामुळे याचा फटका ग्राहकांना बसत असतो.












