माझ्या ओळखीच्या कर्मचाऱ्यावर गैरहजर राहिला म्हणून कारवाई का केली? अशी विचारणा करत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (ई) प्रभाग कार्यालयात जाऊन आरोग्य अधिकारी राजेश नंदलाल भाट यांना नगरसेविका सारिका लांडगे यांचे पती संतोष लांडगे व त्यांचे इतर दोन साथीदार यांनी मिळून बेदम मारहाण केल्याचा घटना समोर येत आहे.
शंकर मुरलीधर सोनवणे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी असून ते कामावर सतत गैहजर राहिल्याने तसेच उद्धट वर्तन करत असल्याने आरोग्य अधिकारी भाट यांनी नोटीस बजावली होती. यावरूनच ही मारहाण झाली असल्याचे बोलले जात आहे.
राजेश भाट यांनी पोलिस तक्रार करू नये यासाठी त्यांच्यावर खूप राजकीय दबाव असताना ही राजेश भाट यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दिली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे , पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे हे अधिक तपास करत आहेत .












