महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर पिस्टलचा धाक दाखवून घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बाणेर ते पुणे युनिवर्सिटी रोडवर अभिमानश्री हॉटेल जवळ 27 ऑक्टोबर 2023 रोजी घडला आहे.
याबाबत चिंचवड येथे राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन चंद्रकांत आनंद गाडे याच्यावर आयपीसी 354, 354अ, 509, 506/2 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
फिर्यादी या आरोपीकडे कामाला आहेत. 27 ऑक्टोबर रोजी महिला अभिमानश्री हॉटेल जवळून जात असताना आरोपीने त्यांना गाडीत ओढून घेतले. महिलेला मिठी मारण्याचा प्रयत्न करुन त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यावेळी महिलेने त्याला विरोध केला असता आरोपीने अश्लील शिवागाळ केली. यानंतर त्याने त्याच्या गाडीत असलेले पिस्टल काढून महिलेला आयुष्यातून उठवण्याची धमकी दिली. तसेच घरच्यांना संपवून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.












