
नव्याने नेहरूनगर येथे स्थलांतरित झालेल्या कोर्ट इमारतीत एकूण ११ कोर्ट रूम हॉल असून देखील शहरासाठी ५ न्यायाधीश काम पाहत होते. न्यायाधीशांची अपुरी संख्या व कामाचा वाढता ताण याची दखल घेऊन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे मा. अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, व कार्यकरणीतील मा.उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, मा. सचिव ॲड. गणेश शिंदे, मा. महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे, मा.सहसचिव ॲड. मंगेश नढे, मा.खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे, मा. ऑडिटर ॲड. राजेश रणपिसे, मा.सभासद ॲड. सौरभ जगताप, ॲड. स्वप्निल वाळुंज, ॲड. अक्षय केदार, ॲड. नितिन पवार, ॲड. पवन गायकवाड, ॲड. प्रशांत बचूटे यांनी वेळोवेळी मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय पुणे येथे जादा कोर्ट, तसेच सिनिअर डिव्हिजन व सत्र न्यायालय यासाठी पाठपुरावा केला. सदर पाठपुराव्याला यश आले असून सध्या स्थितीत मुंबई उच्च न्यायालय नव्याने ४ दिवाणी न्यायाधीश क. स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट याचे सोमवारपासून प्रत्यक्ष कामाकाज चालू होणार आहे. पूर्वीचे ५ व नविन ४ असे मिळून एकूण ९ कोर्ट कार्यरत झाल्याने निश्चित न्यायसंस्थेचा व नागरिकांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच लवकरच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोर्ट देखील चालू होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या व दाव्यांची संख्या लक्षात घेऊन लवकरच मोशी येथील जागेमध्ये विस्तृत कोर्टाचे भूमीपूजन होऊन इमारतीचे काम देखील चालू होणार आहे. नव्याने चालू होणाऱ्या जादा कोर्टामुळे दावे लवकर निकाली होण्यास मदत होणार आहे.












