वत
पुणे, दि. ०७ : बेकायदेशीर रित्या पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीस वाकड पोलिसांनी अटक केली आहे. विशाल ऊर्फ रावण सिध्दु बनसोडे ( वय २५ वर्षे रा. लमाणवस्ती, पीडीसी बँकेचे मागे, खडकवासला ता. हवेली जि.पुणे ) असे आरोपीचे नाव आहे.
दि.०५ रोजी वाकड पोलिसांना बातमी मिळाली की, पुणे शहर हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार पिस्टल सोबत बाळगत डांगे चौक येथे कामानिमीत्त येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांचे पथक छापा कारवाई करण्याकरिता डांगे चौक येथे जावुन सापळा रचून थांबले असता एक इसम संशयित संशयित रित्या मिळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेवुन अधिक चौकशी करून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये ०२ देशी बनावटीचे पिस्टल, ०२ जिवंत काडतुस (राऊंड) असे मिळुन आले.
आरोपी विरोधात भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
ही कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री.डॉ. संजय शिंदे साो, सह. पोलीस आयुक्त, मा.श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड, मा. श्री.डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त साो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफौ. विभीषण कन्हेरकर, सपोफौ. बाबाजान इनामदार, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा संदीप गवारी, पोहवा. बंदु गिरे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोहवा. विक्रांत चव्हाण, पोहवा. अतिक शेख, पोना. प्रशांत गिलबीले, पोना. राम तळपे, पोशि. अजय फल्ले, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. कौंतेय खराडे, पोशि. विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, यांनी मिळून केली आहे.












