पिपंरी चिंचवड : पिपंरी चिंचवड शहरातील महाळुंगे परिसरातील मोई निघोज रोड लगत नितीन शहाजी कर्षे वय ३४ वर्ष, धंदा शेती, व्यापार यांच्या घरात एक अज्ञाताने घुसून चोरी केली.
चोरटयाने घराच्या पाठीमागील बाजुने जिन्या जवळील खिडकीचे लोखंडी ग्रिलचे बार कापुन त्या मार्गाने आत प्रवेश करुन सोन्याचे दागिणे एकुण ४७.८ तोळे वजनाचे त्यात सोन्याचे गंठण, मिनी गंठण, राणीहार, चैन, अंगठया कानातील कर्णफुले जोड, बांगडया, ब्रेसलेट कडे व रोख ३०,४८,४००/- रुपये किंमतीचा मुददेमाल घरफोडी चोरी करुन चोरुन नेला.

फिर्याद दिल्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ८६५/२०२३ भा.द.वि.क. ४५७,३८० अन्वये अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
घर फोडी सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असुन सदरबाबत मा. पोलीस आयुक्त सेा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलाय यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना सीसीटीव्ही, तांत्रिक गोष्टी व गुप्त बातमीदारा मार्फत अज्ञात आरोपीचा शोध घेवुन महाळुंगे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या












