पुणे : पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहळ याची शुक्रवारी त्याच्याच साथीदारांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटने नंतर संपूर्ण पुणे शहर हादरून गेले. या प्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली. पुण्याजवळील शिरवळ इथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज शनिवारी समोर आली आहे. यात स्पष्टपणे दिसत आहे दोन हल्लेखोर गोळी झाडून पसार होताना दिसतायत. गोळी लागताच शरद मोहोळ खाली कोसळला. हल्लेखोराच्या मागे एकजण धावल्याचं दिसून येतंय. तर खाली कोसळलेल्या जखमी शरद मोहोळला उचलून दोघेजण नेत आहेत.
दरम्यान, गुंड शरद मोहोळ याच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून तीन पिस्तुलांसह तीन मॅगझीन, पाच जिवंत काडतुसं आणि दोन मोटारी जप्त करण्यात आल्या. आरोपींविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.












