पुणे : प्रश्नपत्रिका फुटी संदर्भात सावित्रीबाई फुले विद्यापीठाने खुलासा करत एक नोटीस जाहीर केली आहे. त्या नोटीस मध्ये’सारथी, बा्टी, महाज्योती यांच्यातर्फ घेण्यात येणाच्या पीएच.डी. फेलोशिपच्या संयुक्त चाळणी परीक्षेचे आयजनबुधवार, दिनांक १० जानेवारी, २०२४ रोजी सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत पूणे, कोल्हापूर, नागपूर आणि छत्रपतीसंभाजीनगर या शहरांतील परीद्षा केंद्रांमार्फत आयोजित करण्यात आले होते. सदर परीक्षेसाठी ए, बी, सी व डी अशाचार प्रश्नपत्रिका संचांची छपाई करण्यात आली होती. सदर प्रश्नपत्रिका संचांची छपाई दोन वेगवेगळ्या मुद्रणालयांकडून गोपनीयरीत्या करुन घेण्यात आली होती, त्यामूळे छपाई करण्याच्या स्वरुपामध्ये बदल असू शकतो.
सदर प्रश्नपत्रिका संचांची अत्यंत गोपनीय पघ्टतीने आणि विहित सुरक्षा मानकांचे पालन करुन छपाई करण्यात आली होती आणि ती संबंधित परोक्षा कंद्रांवर सीलबंद स्वरुपात पोहचविण्यात आली होती. प्रश्नपत्रिका संच सी आणि डी मधील विद्याध्य्यांसाठी महत्त्वाच्या सूचनेमधील सूचना क्र.३(१) मध्ये प्रश्नपत्रिका उघडण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर लावलेले सील उघडावे, सील नसलेली किवा सील उधडलेली प्रश्नपत्रिका स्वीकारु नये, असे नमूद करण्यात आलेले होते. ए आणि बी प्रश्नपत्रिका संचास सील होते, परंतु सी आणि डी प्रश्नपत्रिका संच वेगवेगळ्या मुद्रणालयाकडुन छपाई करुन घेतले असल्याने त्यांना सील नव्हते, सीलबंद प्रश्नपत्रिका न मिळाल्यामूळे काही परीक्षा्थी हे परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यांच्या बाबतीत परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाली नाही.
सी आणि डी संचामधील प्रत्येक प्रश्नपत्रिका संचास सील नसले तरी प्रश्नपत्रिका संच असलेल्या पाकिटांना सील करण्यात आले होत. सदर पाकिटांचे सील परीक्षा केंद्रांवरच उघडण्यात आले होते. परीक्षा होण्यापूर्व प्रश्नपत्रिकांची प्रत कोणत्याही व्यक्तिकडे कोणत्याही स्वरुपात (Hard Copy किंवा Soft copy) उपलब्ध नव्हती किवा त्या प्रश्नपत्रिकामधील मजकूरदेखील कोणत्याही व्यक्तिला कळालेला नव्हता, संपूर्ण परीक्षा प्रक्रियवादेखील सर्व परीक्षा केंद्रांवर अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात आली आहे. त्यामूळे सदर परीक्षेच्या पेपर फूटीसंदर्भात केलेले आरोप हे पूर्णतः निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. याबाबत परीक्षार्थानी दिलेल्या निवेदनाचा विचार करता, विद्यापीठाने सदर परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन स्थगित केले आहे.’
अशी माहिती व उल्लेख विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.












