पुणे : पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. तीन गोळ्या शरद मोहोळ ला लागल्या त्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळवर आज दुपारी अज्ञातांना गोळीबार केला होता. या हल्ल्यात मोहोळला तील गोळ्या लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचार सुरु असतानाच शरद मोहोळचा मृत्यू झाला आहे.
ज मोहळच्या लग्नाचा वाढदिवस होता त्याच दिवशी त्याचा खून करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर पुण्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. हा हल्ला टोळीयुद्धतून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांनी मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या होत्या.
कोथरूड परिसरातील सुतार दवाखाना परिसरात शरद मोहोळवर दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास 3 ते 4 अज्ञातांनी गोळीबार केला. या हल्ल्यात मोहोळ गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला कोथरूड परिसरातील एका खासगी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू झाला. भर दुपारी अशा प्रकारची घटना घडल्याने मोठी दहशत परसली असून, हा हल्ला टोळीयुद्धतून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हा हल्ला नेमका कुणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून, आरोपींना पकडण्यासाठी टीम रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुण्यात पुन्हा गॅंगवॉर सुरू झाली की काय ? या घटनेनंतर पुण्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.












