पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळपासून ते विविध विकास कामांची पाहणी करत आहेत. तसेच यावेळी त्यांनी ससून रुग्णलयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमावेळी अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यासह आदि नेते उपस्थित होते.
विविध विकास कामांचे उद्घाटन होत असताना
यातच एक धक्कादायक घटना समोर आलीय आहे. भाजप आमदार सुनील कांबळे यांनी एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. ससून रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार यांच्या उपस्थितीत ही घटना घडली आहे.
सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सुरेश सातव यांना मारहाण केली. यामुळे कार्यक्रमस्थळी सर्वच जण गोंधळले. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्ड उद्घाटन कार्यक्रमात ही घटना घडली. ससून रुग्णालयात उद्घाटन पाटीवर नाव नसल्याने कांबळे संतप्त झाल्याने त्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.












