इंन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या ३२ वर्षीय तरुणीवर एका तरुणाने विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत कात्रज, गोवा येथे घडला आहे.
याबाबत ३२ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन समित उमेश सोनवणे (वय-३१) याच्यावर भा.दं.वि.कलम ३७६, ३७६/२/एन, ४१७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, समित आणि पीडित तरुणीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. चॅटींग करत असताना त्यांचे सूत जुळले. आरोपीने त्याचे पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवत तरुणीला अविवाहित असल्याचे सांगितले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर कात्रज येथील एका लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच गोवा येथे फिरण्यास नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता समित याने लग्न करण्यास टाळाटाळ करुन अद्यापर्यंत लग्न केले नाही, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास भरती विध्यापीठ पोलीस करीत आहेत.












