आजपासून राज्यविधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झालं. या अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी विधीमंडळाचा परिसरात सरकारविरोधात घोषणा देऊन दणाणून सोडला. नागपूर विधानभवनात दाखल होत विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध व्यक्त केला. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी देखील विरोधकांनी केली.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे यांच्यासह काही विरोधी नेत्यांनी हातात निषेधाचे काळे फलक हाती घेत खोके सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या आमदारांकडून शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध नोंदवताना विरोधक आक्रमक झाले होते. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधित आक्रमक होत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना या सरकारला शेतकऱ्यानं प्रती संवेदनशीलपणा राहिलेला नाही असं म्हणत शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला.












