पुणे : राज्यात नवीन बनलेले आघाडी शिंदे, फडणवीस,अजित पवार, येत्या रविवारी पुण्यात महायुतीच्या पुणे शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत असून यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार हेच प्रमुख मार्गदर्शक असण्याची शक्यता आहे.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची महायुती होऊन सहा महिने होत आले तरीही अद्याप एकही संयुक्त मेळावा झाला नव्हता. आता महायुतीच्या जिल्हानिहाय सभा महाराष्ट्रभर १४ जानेवारी रोजी आयोजित करण्याचे नियोजन आहे. त्याअंतर्गत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचा पहिला मेळावा रविवारी पुणे शहरात म्हात्रे पुलाजवळ होणार आहे. यामध्ये पालकमंत्री अजित पवार हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व जिल्ह्याचा पहिला मेळावा रविवारी पुण्यात म्हात्रे पुलाजवळ होणार आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. यावेळी तिन्ही पक्षांचे शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा म्हात्रे पूल डीपी रस्त्यावरील शुभारंभ मंगल कार्यालय येथे दुपारी चार वाजता होणार आहे. याच्या नियोजनाची बैठक आज झाली. मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या तिघांपैकी एकजण उपस्थित राहणार आहेत, असे शहराध्यक्ष धीरज घाटे, दीपक मानकर यांनी सांगितले.त्यामुळे महायुतीचा पहिला मेळावा होत असताना शिंदे व फडणवीस हे न आल्यास अजित पवार गट, शिवसेनेसह भाजप कार्यकर्त्यांना दादांचे मार्गदर्शन ऐकून त्यानुसार पुढील काम करावे लागणार आहे.












