शिवसेना कुणाची यावर काल निकाल लागला,शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असा निकाल आल्यानंतर शिवसेनेची हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे माध्यमांशी बोलतांना . त्यांनी आपल्याच शैलीत त्यांनी उत्तर दिले. बांगर म्हणाले मी आधीच छाती ठोक पने म्हणालो होतो. शिवसेना शिंदेंचीच आहे. आणि आताही छातीठोक पने सांगतो २०२४ ला नरेंद्र मोदी पुणे पंतप्रधान होणार. जर असे नाही झाले तर संतोष बांगर भर चौकात फाशी घेणार अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दिली.
संजय राऊत यांनी पूर्वीच्या शिवसेनेची पूर्णतः वाट लावली. शरद पवार यांच्या खुट्याच्या दावणीला त्यांनी शिवसेना बांधली. उद्धवसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही. राम मंदिराच्या निमित्ताने बाळासाहेबांचे स्वप्न आज साकार झालंय. आज बाळासाहेबांचा आत्मा सर्वात जास्त खूश असेल. पण तुम्ही उठसूट सोनिया गांधी, राहुल गांधींचं कौतुक करता. आज महाराष्ट्रातल्या जनतेला कळून चुकले आहे की खरी शिवसेना कोणती, खरा धनुष्यबाण कुणाचा, हिंदुत्ववादी संघटना कोणती…” अशा शब्दात आमदार संतोष बांगर यांनी ठाकरेंना लक्ष्य केलं.












