अंघोळ केल्यानंतर कपडे बदलत असताना तरुणीचे मोबाईलमध्ये चोरुन चित्रीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.२९ फेब्रुवारी) सकाळी सव्वा सहा ते पावणे सातच्या दरम्यान महिलेच्या घरात घडला आहे.
याबाबत २८ वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अज्ञात आरोपीविरोधात आयपीसी ३५४ (क) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बाथरुमध्ये कपडे बदलत असताना त्यांना बाथरूम मध्ये मोबाईल ठेवल्यासारखे वाटले. मोबाईलमध्ये कपडे बदलतानाचे चित्रिकरण करुन मोबाईल घेऊन पळून जातानाचा आवाज तरुणीला आला. आरोपीने तरुणीचा व्हिडिओ अगर फोटो काढून विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.












