पुणे : उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हलक्या ते मुसळधार पावसामुळे वातावरण पुन्हा थंड झाले आहे. तसं पाहिलं तर दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून हलका पाऊस सुरू आहे. अशा स्थितीत दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या परिसरात तापमानात घट नोंदवण्यात आली आहे.
राज्याच्या तापमानात चढ-उतार सातत्याने पाहायला मिळत आहे. आता राज्यातील तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तर निफाडमध्ये ९.१ निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आता राज्यातील तापमान १० अंशांवर राहिल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. तसंच आगामी काळाची उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे












