पुणे : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. या फटका आता सर्वसामान्यांना बसत आहेत. कधी कांदा शंभरी पार होताना दिसत आहे. तर कधी टोमॅटो पण आता लसणाने ४०० रूपये किलोचा दर गाठला आहे.
यामुळे नागरीकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दररोजच्या भाजीची चव वाढण्यासाठी लसनाचा वापर केला जातो. पण आता हा लसून भाजीतून गायब होण्याच्या मार्गावर आहे. तर चला जाणून घेऊयात लसणाचे भाव इतके वा वाढत आहेत आणि कधी कमी होणे अपेक्षित आहे.
लसणाचे भाव का वाढत आहेत ?
खराब हवामानामुळे आणि वातावरणातील बदलांमुळे अनेक राज्यांमध्ये लसून पिकांचे नुकसान झाल्याने लसनाचे दर वाढले आहेत. तसंच पीक निकामी झाल्याने दुसऱ्या पिकांची लागवड कण्यास वेळ लागला त्यामुळे नवीन लसूण पिकाची आवक होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे भाव वाढत आहेत. गेल्या काही आठवड्यांबदल बोलायचे झाले तर लसणाचे भाव झापाट्याने वाढले आहेत. भुवनेश्र्वरच्या बाजारात भाव ४०० रूपये किलोवर पोहोचला होता. लसणाच्या भावात वाढ होण्यामागे हेच प्रमुख कारण आहे.
भाव कधी कमी होतील?
मध्य प्रदेशात लसणाची सर्वाधिक लागवड केली जाते. मात्र खराब हवामानामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नवीन पीक येण्यास विलंब होत आहे. लसणाचे पीक बाजारात येताच. लसणाचे भाव उतरतील. बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते खरीप लसणाची आवक झाल्यानंतर भावात लक्षणीय घट होईल. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात लसणाचे भाव कमी होण्याची शक्यता आहे












