भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पाहोचावेत या दृष्टीकोनातून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेच्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. सर्व विभागांनी समन्वयाने ही मोहीम यशस्वी करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, नगरपालिका प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्यासह पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्व तालुकास्तरावर आणि नगरपालिका स्तरावर समिती गठित करावी.जनजाती गौरव दिनाच्या दिवशी 15 नोव्हेंबर रोजी या यात्रेचा शुभारंभ केला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आदी आदिवासी बहुल भागात कार्यक्रमांचे नियोजन करावे, असेही श्रीमती कदम यावेळी म्हणाल्या.












