मुंबई :मागील दीड वर्षा पासून सुरू असलेला शिवसेनेचा घोळ आज संपला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेला म्हंटला आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे. त्याच विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाने केलेल्या 16 आमदारांच्या याचिकेवर देखील फैसला सुनावलेला आहे. ठाकरे गटाने केलेली याचिका अध्यक्षांनी फेटाळलेली आहे. याचा अर्थ शिंदेंबरोबर असलेले आमदार सगळे आता पात्र ठरले आहे. महायुती सरकारला कुठलाही धोका नाही. भरत गोगावले प्रतोद म्हणून मान्यता त्यांचा व्हिप हा आता लागू होणार.
निकाल देतानी नार्वेकरांनी काही मुद्दे मांडले ३४ याचिका या ६ गटात विभागल्या आहेत. याचिका क्रमांक १८ ही तिसऱ्या गटात आहे. चौथ्या गटात याचिका क्रमांक १९चा समावेश आहे. व्हीपचे उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे.
पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत.२०१८ साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल याबाबत दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार मी घेत आहे. असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हंटले आहे.












