पुणे । प्रतिनिधी
पुणे दि. ०४ : विक्री करण्यासाठी आणलेला तंबाखूजन्य गुटका व पान मसाला हिंजवडी पोलिसांनी जप्त करत ३ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई हिंजवडी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने दि.३ रोजी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ रोजी तपास पथकातील सह पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना त्यांच्या बातमी मतदारामार्फत बातमी मिळाली होती की दोन इसम बेंगलोर मुंबई हायवे वरून पुनवळ्याच्या दिशेने एका पांढरा रंगाची महिंद्रा पिकप मधून प्रतिबंधक असलेले तंबाखूजन्य गुटखा व पान मसाला पदार्थाची विक्री करण्यासाठी घेऊन जाणार आहेत.
सदर बातमीची शहानिशा व खात्री करून हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांना या बातमीची हकीकत कळवून, सह.पो.नी. राम गोमारे, सह.पो.फौ. मारणे, पो.हवा. नारळे, पो.ना. चव्हाण, पो.ना. घडले, पो.शि. पालवे व पो.शि. शिंदे यांनी मुंबई बेंगलोर हायवे येथे जाऊन सापळा लावला व बातमीदाराने वर्णन केल्याप्रमाणे गाडीचा शोध घ्यायला सुरुवात केली असता एक पांढरा रंगाची महिंद्रा पिकप गाडी न्यू सागर हॉटेल समोर ताथवडे येथून जात असताना दिसली, पोलिसांनी सदर गाडी अडवून त्यामधील दोन इसमांना गाडीमधील मला संदर्भात विचारले असता त्यांनी मला बाबत उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये विमल कंपनीचे गुटख्याचे बॉक्स व सुगंधी तंबाखूचे पाऊच आढळून आले.
त्यांनी हे माल कुणाकडून आणला याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा माल हा पाहिजे आरोपी सुजित खिवसरा, राहणार कोथरूड, पुणे याने विक्रीसाठी आणून दिल्याचे सांगितले पोलिसांनी सदरचा गुटखा व महिंद्रा पिकप वाहन ताब्यात घेतले असून एकूण १८,१८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य गुटखा व पान मसाला पदार्थाचा साठा करून त्याच्याने मुखाचे कर्करोग व इतर विकार होऊन शारीरिक हानी होऊ शकते याची जाणीव असून त्याची विक्री करत असल्यामुळे पोलिसांनी वाकाराम ठाकरामजी जाट, वय १९ वर्ष, रा. खालुम्ब्रे, तालुका मावळ मुळगाव बाडनेर – राजस्थान, बोगाराम बिष्णोई, वय १९ वर्ष, व पाहिजे आरोपी सुजित खिवसरा रा. कोथरूड, पुणे यांच्यावर हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि. कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी सुजित खिवसरा याचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहे.












