आजकाल बरेच जण पत्ता विचारण्यास येतात अन् फसवणुक करून जातात असे प्रकार सर्रासपणे घडत असतात हे पत्ता विचारण्यास येतात आणि चोरी,अपहरण,खून असे प्रकार आपल्यासोबत करत असतात अशीच एक घटना कात्रज बस स्टॉप जवळ घडली आहे
सचिन तळवार ( वय ३१ रा.कोल्हापूर ) यांनी तीन अनोळखी इसमांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे
फिर्यादी हे दि.०१ रोजी पहाटे ०४:३० वाजता कात्रज बस स्टॉप पासून पुढे पायी चालत जात होते त्यांच्या मागून दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवत त्यांच्याकडून ४,५०० रू. चोरी करून काढून घेतले फिर्यादीने आरोपींना विरोध केला असता त्यांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे सदरचा गुन्हा हा शाहूपुरी पोलिस स्टेशन मध्ये दाखल करून वर्ग करण्यात आला आहे
आरोपींवर भादवी कलम ३९२,३९४,३४१,३४ आर्म ॲक्ट ४ (२५ ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रसाळ हे करत आहेत












