अनेकांचा लाखों – करोडोंचा मुद्देमाल हा चोरी होत असतो.त्यानंतर पोलिसात तक्रार केल्यानंतर तपास करून पोलिस (Pune Police) गुन्हेगारांकडून तो मुद्देमाल ताब्यात घेतात.ताब्यात घेतल्यानंतरही नागरिकांना तो मुद्देमाल हस्तांतरण केला जात नाही.कोर्टातून तो मुद्देमाल सोडवून आणावा लागतो.त्यासाठी बराच कालावधी लागतो.त्याची प्रक्रिया ही अवघड असते.नागरिकांचा त्रास कमी व्हावा या हेतूने अधिकाऱ्यांनी मुद्देमाल हस्तांतरण सोहळा आयोजित करण्याचे ठरवले.
मा.पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते मुद्देमाल हस्तांतरण सोहळा पार पडला.यात मा.रितेश कुमार ( पोलिस आयुक्त पुणे शहर ), मा.संदीप कर्णिक ( पोलिस सह आयुक्त पुणे शहर), मा. रंजनकुमार शर्मा ( अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर ),मा. रामनाथ पोकळे ( अपर पोलिस आयुक्त गुन्हे पुणे शहर ), मा.प्रविणकुमार पाटील ( अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर ) इ.अधिकाऱ्यांचा सहभाग होता.
या मुद्देमाल हस्तांतरण सोहळ्यात समर्थ पोलिस ठाणे,फरासखाना पोलिस स्टेशन,खडक पोलिस ठाणे,सहकारनगर पोलिस स्टेशन,स्वारगेट पोलिस स्टेशन,लष्कर पोलिस स्टेशन,कोथरूड पोलिस स्टेशन,सिंहगड रोड पोलिस स्टेशन,वारजे माळवाडी पोलिस स्टेशन,दत्तवाडी पोलिस स्टेशन,अलंकार पोलिस स्टेशन, चतुर्शृंगी पोलिस स्टेशन, विमानतळ पोलिस स्टेशन,मुंढवा पोलिस स्टेशन,वानवडी पोलिस स्टेशन,विश्रांतवाडी पोलिस स्टेशन,येरवडा पोलिस स्टेशन इत्यादी पोलिस स्टेशनचा समावेश होता.
या मुद्देमाल हस्तांतरण सोहळ्यात एकूण पावणे सहा कोटींच्या मुद्देमालाचे हस्तांतरण करण्यात आले.तसेच हा किमती मुद्देमाल परत चोरी होऊ नये म्हणून पोलिस स्टेशनचा एक अधिकारी ह्याने मुद्देमालासह फिर्यादींना घरपर्यंत सोडावे अशी जबाबदारी वरिष्ठांकडून त्यांच्यावर सोपविण्यात आली.
मुद्देमाल हस्तांतरण सोहळ्यात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.जसे चूक केल्यास शिक्षा मिळते तसेच उत्तम काम केल्यास शाबासकी मिळते याचे प्रत्यक्ष दर्शन या सोहळ्यात झाले.आगामी काळात अशा घटना घडणार नाहीत याची अधिकारी आणि नागरिक दोघांनी काळजी घ्यावी असे आवाहन मा.पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडून करण्यात आले.











