मित्र – मैत्रिणी हे नेहमी संकटकाळी आपल्याला मदत करत असतात(Latest update pune).मग तो प्रसंग चांगला असे की वाईट.पण एखाद्या मित्राने त्याच्या मैत्रिणीसाठी गुन्हा केलाय अशा घटना क्वचितच पाहायला मिळतात.अशीच एक घटना वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
ओंकार जाधव ( वय २४, रा.वारजे,पुणे )असे फिर्यादीचे नाव असून त्यांनी वारजे माळवाडी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.या गुन्ह्यात एक इसम आणि त्याच्या दोन साथिदारांचा समावेश आहे.
फिर्यादी हे दि.०४ रोजी रात्री १२:३० च्या सुमारास त्यांच्या मित्रासह कर्लीज कॅफे समोर फुटपाथ वर, डी पी रोड, कर्वेनगर, पुणे येथून कॉफी पिऊन जात होते.तेव्हा एक इसम आणि त्याचे दोन साथीदार तेथे आले.त्यांनी फिर्यादीला तू आमच्या मैत्रिणीला शिवीगाळ का केली असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यानंतर धारदार लोखंडी शस्त्राने त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले.
आरोपींवर भादवी कलम ३२४,३२३,३४ महा.पो.अधि. कलम ३७ (१) सह १३५, आर्म ॲक्ट कलम ४(२५). च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेले नाही.सदर गुन्ह्याचा तपास म.पोलिस उपनिरीक्षक जाधव हे करत आहेत.












