आजकाल समाजात चोरीचे प्रकार वाढलेले आहेत.लोक चोरी करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करतील हे सांगता येत नाही.अशीच एक घटना कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.लग्नाच्या ठिकाणी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे(Updated News-pune).
अन्सार कच्छी ( वय ३२ रा.बुधवार पेठ,कराड ) असे फिर्याद दिलेल्या इसमाचे नाव असून त्याने कोंढवा पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी एका अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
अहमद हसन कच्छी असे फिर्यादीच्या आईचे नाव असून त्या दि.०३ रोजी रात्री ०८:०० ते दि.०४ रोजी रात्री ०१:०० च्या दरम्यान रा. फ्लॅट नं १०२ गॅलेक्सी प्रिमीयर सोसायटी कौसरबाग कोंढवा खुर्द पुणे येथे एका लग्न सोहळ्यासाठी आल्या होत्या.त्यांनी त्यांच्या जवळ असलेले दोन लाख पाच हजार किमतीचे सोन्याचे दागिने हे बेडरूम मधील एका ट्रॅव्हल्स बॅग मध्ये ठेवले होते.ते दागिने कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेले आहेत.
आरोपीवर भादवी कलम ३८० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे हे करत आहेत.












