परदेशात हेल्पर, वेल्डर, कारपेंटर, इलेक्ट्रिशन, प्लंबर, ड्रायव्हर, पॅकिंग हेल्पर इत्यादी नोकरी उपलब्ध असल्याची जाहिरात टेम्प्लेट बनवून व रेल्वे स्टेशन बस स्टॉप अशा ठिकाणी वर चिटकून व मोक्याच्या जागी वाटप करून नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला बृहन्मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकले आहेत.
शाहिद हुसेन मो. हुसेन शेख, वय ३९ धंदा एजंट, रा. रूम नं. २०२ पास्कल कॉलनी, बांद्रा, मुंबई व मो. नाजीम शब्बीर मनिहार, वय ४५ धंदा एजंट रा. रूम नं. ४०६ आझमी नगर, आकाश वाडी, मालाड पु. मुंबई असे अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपींनी छापलेल्या टॅम्पलेट वरचे नंबरवर इच्छुक बेरोजगार तरुणांनी कॉल केले असता त्यांना ऑफिसचा पत्ता व माहिती दिली जायची, इच्छुक बेरोजगार यांना विश्वास बसावा याकरिता या तोतया एजंटांनी कार्यालयाच्या नावाने व्हिजिटिंग कार्ड देखील बनवले होते, ऑफिसमध्ये आल्यानंतर इच्छुक बेरोजगारांना ते कार्ड दिले जायचे नंतर त्यांना परदेशातील कंपनीचे नावे सांगून मोठ्या पगाराची माहिती देऊन त्यांना आमिष दाखवले जात होते. शक्यतो रोखीने पैसे देणे बाबत भर दिली जायची मात्र सध्या ऑनलाईन पेमेंटची चालती असल्याने आरोपींनी स्कॅनर द्वारे रक्कम स्वीकारले, ते स्वतःची खोटं नाव सांगत असे त्याचप्रमाणे बनावट नावाने भाड्याने घेतलेले कार्यालय घेऊन इच्छुक बेरोजगार तरुणांना परदेशातील नोकरीची माहिती देऊन त्यांच्याकडून त्यांची मेडिकल टेस्ट करून जॉब एग्रीमेंट बनवून घेऊन प्रथम काही रक्कम रोखणे घेऊन उर्वरित रक्कम विजाच्या वेळेला हे लोक घेत असे.
फसणूकीचा टागोर पूर्ण झाल्यावर पळून जायचे
हे तोते एजंट एक लक्ष ठरवायचे व त्याप्रमाणे फसवणुकीचे ते लक्ष पूर्ण झाल्यावर सदरचे कार्यालय बंद करून तिथून लंपास व्हायचे तसेच इच्छुक रोजगारांना तरुणांना मूळ कागदपत्र त्यांच्या पत्त्यावर पाठवण्यात येत होते जेणेकरून गुन्हा नोंद होण्याची शक्यता कमी असायची, यापूर्वी या टोळीने मुंबई येथील खार जोगेश्वरी मिरा रोड असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने कार्यालया उडून १०० हून अधिक इच्छुक बेरोजगार तरुणांची फसवणूक केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
सदर गुन्हा आत्तापर्यंत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून यांचे साथीदारांचा तपास निष्पन्न झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे.












