डॉक्टरांची चिठ्ठी म्हटलं की, सर्वसामान्यांना जणू ते कागदाला रंग दिला असे वाटते. डॉक्टरांचं झिग-झॅग लिखाणं समजणं, हा सर्वसामान्यांसाठी एक टास्कच आहे. पण, आता डॉक्टरांना आता कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहावी लागणार आहे. ओडिशा उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात डॉक्टरांसाठी महत्त्वाचे निदेश दिले आहेत. ‘झिग-झॅग’ लिहिणं बंद करा, असा आदेश ओडिशा हायकोर्टाने दिला आहे. ओडिशा उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व डॉक्टर आणि खासगी रुग्णालयांना मोठे आणि महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
आता डॉक्टरांना चिठ्ठी लिहिताना स्पष्ट आणि सुवाच्य हस्ताक्षरात किंवा कॅपिटल अक्षरात लिहावी लागतील. राज्यातील सर्व डॉक्टर, खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना यापुढे सर्व प्रिस्क्रिप्शन, पोस्टमार्टम अहवाल आणि वैद्यकीय-कायदेशीर कागदपत्रे स्पष्ट आणि सुवाच्य हस्तलिखितात किंवा मोठ्या अक्षरात लिहिण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती एसके पाणिग्रही यांनी मुख्य सचिवांना या आदेशाची प्रत सर्व वैद्यकीय केंद्रे, खाजगी दवाखाने आणि वैद्यकीय महाविद्यालयांना पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
ओडिशा हायकोर्टाच्या या निर्णयाचे तेथिल नागरिकांनी स्वागत केले आहे. अनेकदा डॉक्टर काय लिहून देतात त्याची ते मेडिकल मध्ये औषध देणाऱ्याला पण कळत नाही त्यामुळे अनेकदा चुकिचे औषध घेऊन अनेक लोकांचा जीव गेलेला आहे. त्यामुळे ओडिशा हायकोर्टाने हा मोठा निर्णय घेतला.












