चंदनाच्या वृक्षाला बाजारामध्ये खूप मोठी मागणी आहे. याच मागणीमुळे चंदनाच्या झाडाच्या चोरीची घटना आपण अनेक वेळा पाहतो. अशीच एक घटना दि पूना क्लब पुणे येथे घडली.
फिर्यादी हे दि पुना क्लब येथे सेक्युरिटी गार्डचे काम करतात. बुधवारी दिनांक सात जून रोजी ते ती पुना क्लब वर पहारा देत असताना पाच अनोळखी असं तिथे एकत्र आले. त्यांनी फिर्यादींना लोखंडाच्या करवतीचा धाक दाखवत ८० हजार रुपये किमतीचे चार चंदनाची झाडे जबरदस्तीने चोरून नेली(Crime).
याप्रकरणी पाच अनोळखी इसमाविरुद्ध बंद गार्डन पोलीस स्टेशन मध्ये भादविक 395,427 सह मपोकाका 37/1 सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












