“आज तुझा मॅटरच क्लोज करतो” असे म्हणत मारहाण केल्याची घटना बंडगार्डन परिसरात घडली.
फिर्यादी यातील अत्तार वय 31 वर्ष राहणार शास्त्रीनगर येरवडा हे सत्ताम ट्रॅव्हल्स बंद गार्डन येथे मॅनेजर म्हणून काम करतात. मंगळवारी दिनांक 6 जून रोजी फिर्यादी काम करत असताना तीन अनोळखी इसम आणि त्यांचे दोन साथीदार तिथे आले. काहीही कारण नसताना फिर्यादी यांच्यासोबत काम करणारा मुलगा महेश यांचा गळा आवळला. हे पाहताच फिर्यादी भांडण सोडवण्याकरता गेले असता नमूद इसमानी “आज तुझा मॅटरच क्लोज करतो” असे बोलून फिर्यादींच्या डोक्यात दगड घातला. आरोपी अनोळखी इसमानी त्यांच्या साथीदारांसोबत इतर तीन कामगारांना हाताने, लाताबुक्याने व दगडाने मारून जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला(Koregaon park).
याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये भादविक 307 325 326 143 147 405 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॅनेजर सहित कामगारांना मारहाण(Koregaon park)












