मागील काही दिवसांपासून लव जिहाद (Love Jihad) चे प्रकरणे उघडकीस येत आहेत . याचाच निषेध म्हणून पुण्यातील घोरपडी परिसरात आज (दी ४ जुन) मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा साठी अनेक कार्यकर्ते या मोर्चात सामील झाले होते. पुण्यातील या मोर्चामध्ये नितेश राणे उपस्थीत होते. राणे यांनी पिडीत तरुणीसह कुटुंबाची भेट घेतली. लव जिहाद विरोधात कठोर कायदा आला पाहिजे आणि असे कृत्य करणाऱ्या लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी या वेळी करण्यात आली .
” हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नसून आम्ही सर्व हिंदू बांधव लव जिहाद विरोधात एकत्र आलो आहोत” असे नितेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.
“मला एम्प्रेस गार्डन मधे नेऊन जबरदस्ती केली जर तू कोणाला संगतीले तर तुझ्या घरच्यांना मारून टाकेल अशी धमकी आरोपीने मला दिली” असे पिडीत तरुणी पत्रकार परिषदेत म्हणाली












